राज्याची आर्थिक स्थिती उत्तम - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला. आयआयएमयूएनद्वारे (इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स) आयोजित "इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट फॉर युनाईट नेशन्स' या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. 

मुंबई - राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला. आयआयएमयूएनद्वारे (इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स) आयोजित "इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट फॉर युनाईट नेशन्स' या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. 

जगभरात आर्थिक मंदी आलेली असताना तरुणांनी मुख्यमंत्र्यांचे या विषयावरचे मत जाणून घेणे महत्त्वाचे मानले असता, त्यांच्या या विषयावरच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की देशात आणि राज्यात उद्योगस्नेही धोरण आखण्यात आले आहे. राज्यातील आर्थिक स्थिती आटोक्‍यात असून येत्या तीन ते सहा महिन्यांत देश आर्थिक क्षेत्रात पुन्हा भरारी घेईन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The financial position of the state is good says CM