First Female Airplane Pilot : आशियाची पहिली कमर्शियल पायलेट आहे भारतीय महिला

भारताची महिला पायलट कॅप्टन इंद्राणी सिंग हे वैमानिक विश्वातल एक खूप मोठं नाव
First Female Airplane Pilate
First Female Airplane Pilateesakal
Updated on

First Female Airplane Pilate : भारताची महिला पायलट कॅप्टन इंद्राणी सिंग हे वैमानिक विश्वातल एक खूप मोठं नाव आहे. 28 नोव्हेंबर 1996 रोजी त्यांनी अमेरिकन कंपनी बोईंगचे एअरबस A-300 हे विमान उडवून आशियातील पहिल्या कमर्शियल महिला पायलट बनण्याचा विश्वविक्रम केला. इंद्राणी ह्या त्या विमानाच्या कमांडर होत्या.

कोण आहेत कॅप्टन इंद्राणी?

बंगाली कुटुंबात जन्मलेल्या इंद्राणीच लहानपणापासूनच आकाशात उंच उडण्याच स्वप्न होत. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील समर फील्ड स्कूलमधून घेतले, त्यानंतर ऑल इंडिया ग्लायडिंग क्लबमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्या इंडियन एअरलाइन्समध्ये रुजू झाल्या. 1989 मध्ये त्यांना एअरबस 320 चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी फ्रान्सला पाठवण्यात आले. कॅप्टन इंद्राणी सिंग एअरबस 320 उडवणारी जगातील पहिली महिला पायलट ठरल्या.

First Female Airplane Pilate
Female अन् Male Condom मधला फरक माहितीये का?

गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार

कॅप्टन इंद्राणी सिंग ह्या सामाजिक कार्यात खूप सहभागी असतात. सुरुवातीपासूनच त्यांना गरजू मुलांच्या भविष्याची काळजी होती. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. पायलट झाल्यानंतर त्यांनी गरीब आणि गरजू मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. 1996 मध्ये त्यांनी Literacy India नावाचा NGO सुरू केली.

First Female Airplane Pilate
Poli Ladu Recipe : शिळ्या पोळ्या उरल्या आहेत? मग बनवा खास गुळाचा लाडोबा

ज्यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना शिक्षण देण्याच काम केल जाईल. त्यांनी ही उदात्त मोहीम सुरू केली तेव्हा त्या वेळी फक्त पाच मुले होती. आता त्यांच्या एनजीओ अंतर्गत सुमारे 25 हजार मुलांना शिक्षण मिळाले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना 2009 मध्ये वुमन अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय इंटरनॅशनल काँग्रेस फॉर वुमनतर्फे गॉडफ्रे फिलिप या स्पेशल अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com