Palghar News: मासेमारी बोटीला अपघात! पालघरच्या चार खलाशांचा गुजरातच्या समुद्रात मृत्यू
Kokan News: पालघरच्या ग्रामीण भागातील शेकडो खलाशी रोजगारासाठी गुजरातमधील मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करतात. या दुर्घटनेनंतर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तारापरः समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली गुजरातमधील ‘निराली’ ही बोट मासेमारी करून परतत असताना अपघात होऊन बोटीवरील पालघरच्या झाई येथील चार मच्छीमार खलाशांचा बुडून मृत्यू झाला. यामुळे परिसरावर शोककला पसरली आहे.