Vidhan Sabha 2019 : यादी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांचे अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच आज (ता. 01) पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. इस्लामपुर, चिपळूण, अमळनेर, चोपडा, आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच आज (ता. 01) पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. इस्लामपुर, चिपळूण, अमळनेर, चोपडा, आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर- वाळवा विधानसभा मतदारसंघातून तर, चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शेखर निकम, मुरबाड विधानसभा मतदारसंघातून प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अनिल भायदास पाटील यांनी तर, जगदीश वळवी यांनी चोपडा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आजच्या राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत यादी कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five NCP candidates filed applications before the list was declared