esakal | मुंबई-पुण्यात पूरस्थिती, मराठवाडा कोरडाच!
sakal

बोलून बातमी शोधा

Flood situation in Mumbai-Pune

राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये धुवाधार पाऊस बरसल्याने या भागातील धरणे काठोकाठ भरली आहेत. या पाचही जिल्ह्यांत यंदाच्या पावसाळ्यातील सरासरी केव्हाच ओलांडली आहे.

मुंबई-पुण्यात पूरस्थिती, मराठवाडा कोरडाच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये धुवाधार पाऊस बरसल्याने या भागातील धरणे काठोकाठ भरली आहेत. या पाचही जिल्ह्यांत यंदाच्या पावसाळ्यातील सरासरी केव्हाच ओलांडली आहे. मात्र, दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याचे डोळे अजूनही पावसाकडे लागले आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांत २७ टक्के पाऊस पडला. १ जून ते ४ ऑगस्ट यादरम्यान महाराष्ट्रात ५९२.२ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा यादरम्यान ७५४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस
देशात महाराष्ट्र आणि सिक्कीम (२८ टक्के) या दोनच राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. देशात सर्वाधिक पाऊस मध्य महाराष्ट्रात या हवामान उपविभागात पडला आहे. येथे पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत ४३६.४ मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी सरासरीपेक्षा ५८ टक्के जास्त म्हणजे ६९०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

    सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडलेले जिल्हे - ५
    पावसाची सरासरी ओलांडलेले जिल्हे - ८
    सरासरी गाठलेले जिल्हे - १५
    सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेले जिल्हे - ८
    मध्य महाराष्ट्रात पडलेल्या पावसाची टक्केवारी - ५८ 
    कोकणातील पावसाची टक्केवारी - ४५
    मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत १८,
तर विदर्भात ५ टक्के कमी पाऊस
    राज्यात सर्वाधिक पाऊस पुण्यात.
(सरासरीच्या तुलनेत ११८ टक्के)
    सर्वांत कमी पावसाची नोंद बीड येथे.
(सरासरीच्या तुलनेत ३९ टक्के कमी)

loading image