
नाशिक : आदिवासी विकास विभागासाठी स्वतंत्र ९.३५ टक्क्यांचा अर्थसंकल्प असला तरी त्यातून ३,४०० कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतात. राज्य सरकारने हा खर्च सर्वसाधारण अर्थसंकल्पातून करावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज येथे दिली. या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने कसा होईल, याची काळजी मात्र सर्व आदिवासींनी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.