Food poisoning: नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगरीतून विषबाधा झाल्याने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Food poisoning: नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगरीतून विषबाधा झाल्याने खळबळ

Food poisoning: नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगरीतून विषबाधा झाल्याने खळबळ

भगरीच्या पिठातून 13 पेक्षा अधिकजणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगर आणि भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबादसह जालना जिल्ह्यात घडली आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Food poisoning bhagar navratri festival aurangabad and jalna )

औरंगाबादच्या लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी 13 जणांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. तर जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील 24 जणांना विषबाधा झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या लासून स्टेशन येथे नवरात्रोस्तवानिमित्त भगर व भगरीचें पीठ ग्रामस्थांनी विविध ठिकाणाहून खरेदी केलं होते. मात्र, भगरीचे सेवन केल्याने १३ जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर गावातील खासगी रुग्णलायात उपचार सुरु आहेत.

या घटनेसंदर्भात अन्न व औषधी प्रशासन विभागास तपासणी करण्याबाबत सूचना करण्यात येईल. तर अन्नबाधा झालेल्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली आहे.

औरंगाबादप्रमाणे जालाना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातदेखील भगरीच्या पिठातून विषबाधा झाली आहे. परतुर तालुक्यातील चार गावांमधील 24 जणांना विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. तर विषबाधा झालेल्या सर्वच व्यक्तींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.