
पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानीच! मैदानी ५० तर लेखी १०० गुणांची परीक्षा
सोलापूर : महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पोलिस भरतीसाठी आता पहिल्यांदा मैदानी चाचणीच घेतली जाणार असल्याचे २३ जून रोजी स्पष्ट करण्यात आले आहे. ५० गुणांची शारीरिक चाचणी तर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील तरूणांना सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक चाचणीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांनाही पोलिस भरतीची संधी मिळत नव्हती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: शिवसेनेच्या बंडखोर ३७ आमदारांची गोची! आता उरले ‘हे’च तीन पर्याय
लेखी चाचणीत बहुतेक प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारचे असतील. लेखी परीक्षेत उमेदवाराला किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात १० जागा रिक्त असतील तर त्यासाठी एका पदासाठी दहा जणांना (शारीरिक योग्यता चाचणीत किमान ५० टक्के गुण अपेक्षित) लेखी चाचणीसाठी बसता येईल. पण, दहा जागांसाठी १०० जण लेखी परीक्षेस पात्र झाले आणि शंभराव्या क्रमांकावरील उमेदवाराला जेवढे गुण आहेत, तेवढे गुण असलेल्या उर्वरित उमेदवारांनाही लेखी परीक्षा देता येणार आहे. आता २०२० मधील सात हजार २३१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली होती. राज्याच्या गृह विभागात सद्यस्थितीत तब्बल ४९ हजार पदे रिक्त आहेत. आता परीक्षेची कार्यपध्दती निश्चित झाल्याने रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे. महिलांना ८०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशी शारीरिक चाचणी असेल. पहिल्यांदा लेखीऐवजी आता मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये (पोलिस भरतीची तयारी करणारे) आनंदाचे वातावरण आहे. ‘सकाळ’ने यासंदर्भात सातत्याने वृत्त प्रकाशीत केले होते.
हेही वाचा: पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा ‘मैदानी’च! पहिल्या टप्प्यात ७२३१ पदांची भरती
लेखी परीक्षेचे स्वरूप
- १६०० मीटर धावणे : २० गुण
- १०० मीटर धावणे : १५ गुण
- गोळाफेक : १५ गुण
हेही वाचा: राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती! भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?
लेखी परीक्षेचे स्वरूप
- शारीरिक चाचणीत ५० टक्के गुण
- रिक्त जागांच्या एकापदासाठी १० जणांची होईल निवड
- अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न
- लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ
Web Title: For The First Time In The Ground Test For Police Recruitment Field Test Of 50 Marks And Written Test Of 100
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..