CBI Action
CBI Actionesakal

Videocon Fraud : ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना 'सीबीआय'कडून अटक

Published on

नवी दिल्लीः आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे.

सीबीआयने ही कारवाई कथित कर्ज फसवणूक प्रकरणात केलेली आहे. चंदा कोचर ह्या सीईओ असतांना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला ३ हजार २५० कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे. शिवाय त्यांच्यावर अनिमिततेचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.

हेही वाचाः Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

ईडीने फेब्रुवारी २०१९ मध्ये या प्रकरणात खटला दाखल केला होता. चंदा कोचर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप आहे. आज या प्रकरणामध्ये सीबीआयने कारवाई केलीय.

CBI Action
Bharat Jodo Yatra : इतक्या थंडीतही टी-शर्ट घातला.. नेमकं खाता काय? मंत्र्याची अजब टीका

नेमकं प्रकरण काय?

२००९ आणि २०११ यादरम्यान व्हिडीओकॉन समूहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांना कर्ज देतांना चंदा कोचर यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. वेणुगोपाल यांनी आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेऊन Nupower Renewables मध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केल्याचाही आरोप करण्यात आलेला होता. याच प्रकरणात चंदा कोचर यांना ईडीने २०२१मध्ये अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com