esakal | सहा महिन्यानंतर 'पुन्हा येईन' : देवेंद्र फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

cm.jpg

दादरच्या भाजप कार्यालयात भाजप आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक झाली, या बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेवर जाेरदार टीका केली.

सहा महिन्यानंतर 'पुन्हा येईन' : देवेंद्र फडणवीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात तीन पक्षांचे सरकार चालूच शकत नाही, त्यामुळे आपलेच सरकार येईल. हे सरकार तयार होणार नाही आणि झाले तरी सहा महिने टिकणार नाही, त्यामुळे आपलेच सरकार येणार,'' असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. भाजप आमदारांच्या बैठकीत बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

दादरच्या भाजप कार्यालयात भाजप आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक झाली, या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य करतानाच शिवसेनेवरही टीका केली. भाजपच्या सहभागामुळेच मित्रपक्षांना जास्त जागा जिंकता आल्या. भाजपचे नेते शिवसेनेच्या अनेक मतदारसंघांत प्रचारासाठी गेले, या उलट शिवसेनेचा एकही नेता भाजप उमेदवारांच्या मतदारसंघांत प्रचारासाठी आला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

आमदारांनी जनतेत जावे, काम करावे. मुंबईत थांबण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना भक्कम मदत मिळेल, हे निश्‍चित आहे. सत्तेसाठी भाजप काम करीत नसून, जनतेसाठी काम करणे, हे आपले पहिले लक्ष्य आहे,'' असे ते म्हणाले. 

फडणवीस म्हणाले... 

  • भाजप वगळता कोणतेही सरकार राज्यात तयार होऊ शकत नाही, अशीच राजकीय स्थिती आहे आणि त्याचा निर्णय योग्य वेळी पक्ष घेईल. 
  •  शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा, त्यांना दिलासा द्या, त्यांना मदत करा. 
  •  संघटनावाढीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. भविष्यातील आपले ध्येय हेच असले पाहिजे. 
  •  नेतृत्वाचा आमदारांवर विश्वास असलेला एकमेव पक्ष भाजप आहे.
loading image