Manohar Joshi Passed Away: राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन; शिवसेनेचा सभ्य अन् सुसंस्कृत चेहरा हरपला

Manohar Joshi Passed Away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास निधन झालं.
Manohar Joshi Passed Away
Manohar Joshi Passed AwayEsakal

Manohar Joshi Passed Away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते. विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदं मनोहर जोशी भूषवली होती. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते.

Manohar Joshi Passed Away
जिल्ह्यातील ‘या’ २२ ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार! ११ ग्रामपंचायतींना १० लाख रूपयांचे बक्षिस, माढ्यातील ‘ही’ ग्रामपंचायत ४० लाख रूपयांची मानकरी

राजकीय कारकिर्द

1976 ते 1977 या काळात मनोहर जोशी मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर ते लोकसभेत गेले.

...म्हणून दिला होता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

१९९८ मध्ये युती सरकारच्या काळात मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा पुण्यात कर्वे रोडसारख्या प्राईम एरिआत त्यांचे जावई गिरीश व्यास यांना इमारत बांधायची होती. पण भूखंड शाळेसाठी आरक्षित होता. जेव्हा या इमारतीसंबंधीची फाईल जोशींसमोर आली तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

Manohar Joshi Passed Away
Manoj Jarange on Ajay Baraskar: बारसकरांच्या ट्रॅपमागे फडणवीसांच्या मंत्र्यांचा हात? मनोज जरांगे यांनी सांगितला बारसकरांचा इतिहास?

या प्रकारामुळे 'वर्षा' आणि 'मातोश्री' बंगल्यांमधला तणाव अगदी टोकाला गेला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक चिठ्ठी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धाडली. मनोहर जोशी यांनी आधी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा सुपूर्त करावा आणि मगच मला भेटायला यावे, असा निरोप बाळासाहेबांनी पाठवला. हा निरोप मिळताच क्षणाचाही विलंब न करता जोशींनी राज्यपाल अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com