
नागपूर : मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar)हे मुख्यमंत्र्यांच्या समत्तीने बोलले, की निवडणुका होऊ देणार नाही. राज्य निवडणूक आयोग देखील राज्य सरकारच्या सहमतीनं काम करतं. मंत्र्यांनी निवडणूक न होऊ देण्याची भाषा केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने (state election commission) निवडणुका लावल्याच कशा? असा सवाल माजी मंत्री आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनुकळे (former chandrashekhar bawankule) यांनी उपस्थित केला. (former minister chandrashekhar bawankule on zp election without obc reservation in nagpur)
राज्य निवडणूक आयोगाने दोन महिने राज्य सरकारची वाट पाहिली. ओबीसी आरक्षणाचा निर्णय करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवायचा होता. पण, राज्य सरकारने दोन महिने टाइमपास केला. कुठलीही कारवाई केली नाही. राज्य सरकारच्या नाकार्तेपणामुळे निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या आहेत. छगन भुजबळ आंदोलन करतात आणि नाना पटोले राजकीय वक्तव्य करत आहेत. ओबीसींना आरक्षण न देण्याबाबत यांच्यामध्ये अंतर्गत काहीतरी शिजतंय. यामध्ये काहीतरी दडलं आहे. यांना ओबीसींना न्याया द्यायचा नाही, असा आरोपही त्यांनी केला.
जोपर्यंत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही तोपर्यंत निवडणुका थांबणार नाही. हे फक्त घोषणा करतात. पण, राज्य सरकारच्या कृतीमध्ये काहीच दिसत नाही. नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे, असेही बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित केल्या आहे. त्यामुळे आता ओबीसींमध्ये असंतोष पसरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.