esakal | माजी मंत्री राम शिंदेंची कन्या झाली सोलापूरची सून
sakal

बोलून बातमी शोधा

राम शिंदे यांच्या कन्येचा विवाह सोहळा

माजी मंत्री राम शिंदेंची कन्या झाली सोलापूरची सून

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर : माजी मंत्री राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता आणि आएएस श्रीकांत खांडेकर (shrikant khandekar) हे काल (रविवारी) विवाहबद्ध झाले. पुणे येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सोशल मीडियातून या विवाह सोहळ्यातील छायाचित्र कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्यानंतर मतदारसंघात याची माहिती झाली. कोरोनामुळे उपस्थितीची मर्यादा असल्याने या लग्नसोहळ्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला नसल्याचे शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. (Former minister Ram Shinde's daughter gets married)

या सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर आदी नेतेमंडळी उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांचीही उपस्थिती उल्लेखनीय होती. अगदी मोजकीच मंडळींना लग्नाचे निमंत्रण असल्याने या सोहळ्याविषयी मतदारसंघात कोणाला फारशी माहिती नव्हती.

कोण आहेत जावई

श्रीकांत खांडेकर (वावची, ता. मंगळवेढा जिल्हा सोलापूर) यांनी बी.टेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यामातून ते आएएस झाले. सध्या त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना बिहार केडर मिळाले आहे. शिंदे यांची मुलगी डॉ. अक्षता डॉक्टर आहे. दुसरी कन्या अन्विता ही एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला आहे. श्रीकांत यांचा मोठा भाऊ हा विवाहित असून ते मार्केटिंग मॅनेजर आहेत.

व्हॅलेंटाईनच्या डेला झाला होता साखरपुडा

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी श्रीकांत आणि अक्षता यांचा साखरपुडा चौंडी (ता. जामखेड) झाला होता. जावई हा साधारण कुटुंबातील आहे. श्रीकांत यांच्या सत्कारासाठी वावची येथे गेले होते. त्यावेळीच शिंदे यांना श्रीकांत हे जावई म्हणून पसंत पडले होते. (Former minister Ram Shinde's daughter gets married)

loading image