मशिदीवरील भोंग्याबाबत अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय?

Laxman Mane Raj Thackeray
Laxman Mane Raj Thackerayesakal
Summary

'संविधानावर आक्रमण करून भाजपनं देशभरात धुडगूस घातलाय.'

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी सर्व जातींचा अभ्यास करून भारतीय संविधान (Indian Constitution) तयार केलं असून, ते सर्वोच्च आहे. त्या संविधानावर आक्रमण करून भाजपनं देशभरात धुडगूस घातला आहे. याचबरोबर राज्य शासनाला मशिदीवरील भोंग्या संदर्भात अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय आहे? घटनेनं सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिलं असताना सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर आपण स्वतः वेळप्रसंगी गुन्हा दाखल करू, असा इशारा माजी आमदार लक्ष्मण माने (Former MLA Laxman Mane) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शासकीय विश्रामगृहात आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला.‍ श्री. माने म्हणाले, ‘‘मनसे (Maharashtra Navnirman Sena, MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केवळ ठाकरे घराण्यात जन्म घेण्याव्यतिरिक्त देशाच्या जडणघडणीत काय योगदान दिलं आहे. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीचे एक मोठे नेतृत्व होते. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा. राज्यभरातील भोंग्यांसदर्भात राज ठाकरे यांचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे.

Laxman Mane Raj Thackeray
राजकीय उलथापालथ होणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्षानं घेतली शरद पवारांची भेट

भारतीय दंड विधानाप्रमाणे हा फौजदारी गुन्हा असून, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करायला पाहिजे.’’ कोणाची तरी सुपारी घेऊन राज ठाकरे काम करत आहेत. घटनेच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांचा प्रतिकार केलाच पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या देशात फाळणी सदृश्य परिस्थिती निर्माण करायची आहे का? आणि हा अधिकार त्यांना कोणी दिला, असा सवाल मानेंनी केलाय.

Laxman Mane Raj Thackeray
उदयनराजेंच्या साताऱ्यात सदावर्तेंनी उडवली 'कॉलर'; दिलं थेट चॅलेंज

‘आम्ही सारे भारतीय’ अभियान

येत्या २१ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘आम्ही सारे भारतीय’ असे राज्यव्यापी अभियान सुरु करणार आहे. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्या-टप्प्याने अभियान राबविणार असून, त्याची सुरुवात २१ रोजी सकाळी ११ वाजता सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून करणार असल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com