
‘पूर्वी विरोधकांना राजकीय विरोधक समजायचे आता शत्रू समजतात’
दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना संसदेत विरोधी पक्षातील लोकांना अगोदर नमस्कार करायचे. मग सरकारी पक्षातील लोकांकडे पाहून नमस्कार करीत असायचे. पूर्वी दुसऱ्यांप्रती आदर असायचा. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) सर्वांना सोबत घेऊन चालायचे. आता तसे राहिलेले नाही. पूर्वीच राजकारण वेगळ होते. पूर्वी विरोधकांना राजकीय विरोधक समजायचे आता राजकीय शत्रू समजतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. (Formerly considered political opponents, now enemies)
महाराष्ट्र दिनानिमित्त माझ्या कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्वी शरद पवार, सुधारकर नाईक, विलासराव देशमुख, शिंदे यांच्यासारख्या नेते होते. यांच्या मनात दुसऱ्यांपती कोणत्याही प्रकारचा आकस असायचा नसायचा. संसदेत विरोधकांनी विरोध केला तरी दुसऱ्यादिवशी एकमेकांसोबत फिरायचे. एखाद्या कार्यक्रमाला सोबत जात असे. अडचणीत मदत करीत होते. आर्थिक मदत करण्यासाही मागे पाहत नव्हते. कधी स्वःर्चातून तर कधी राजकीय फंडातून मदत करीत असे, असेही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
आता विरोधक (Opponent) बोलला की राजकीय शत्रू समजले जाते. त्याचे तोंड कसे बंद करायचे याचा विचार केला जातो. यासाठी कोणत्याही पद्धतीचा अवलंब केला जातो. यामुळेच महाराष्ट्रात काही ना काही सतत सुरू असते. दोन, चार, पाच लोक यासाठी ठेवलेली आहेत. ते रोज भाष्य करीत असतात. ही आपल्या महाराष्ट्राची सस्कृती नाही. यशवंतराव चव्हाण हे विरोधकांनाही जवळ घेत असे. मात्र, आता तसे होताना दिसत नाही.
आता प्रत्येकाच्या तोंडात ठोक शब्द
यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) सर्वांना सोबत घेऊन चालत असे. सगळ्यांना एकत्र घेऊन बरोबर जायचे. आता मात्र प्रत्येकाच्या तोंडात ठोक शब्द आलेला आहे. विरोधकांना ठोकण्याची भाषा वापरली जात आहे. याला ठोक त्याला ठोक हाच शब्द चर्चेत आहे. शब्दातच ठोक शब्द आल्याने पुढे काय होणार हे सांगायची गरज नाही, असेही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.