मांजरम भागात पुराच्या पाण्यात चार जण गेले वाहून

प्रदीप पाटील
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नायगाव तालुक्यातील मांजरम परिसरात पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या वेगवेगळ्या दोन घटनेत तवेरातील तीन जण वाहून गेल्याची तर दुसऱ्या एका घटनेत पाण्याचा अंदाज घेण्यासाठी उतरलेला तरूण वाहून गेल्याची घटना सोमवारी घडली.
 

नायगाव- नायगाव तालुक्यातील मांजरम परिसरात पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या वेगवेगळ्या दोन घटनेत तवेरातील तीन जण वाहून गेल्याची तर दुसऱ्या एका घटनेत पाण्याचा अंदाज घेण्यासाठी उतरलेला तरूण वाहून गेल्याची घटना सोमवारी घडली.

तसेच, अन्य एका घटनेत एका शेतकर्यांची म्हैस वाहून गेल्याची माहिती आहे. या बाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, बरबडा ता. नायगाव येथील बाबूशा उर्फ गंगाधर मारोती  दिवटे ( वय 40 ) हा एम.एच. 37 जी 5618 या क्रमांकाच्या तवेरा गाडीत आपली पत्नी व मुलीला घेऊन मांजरम येथे बहिणीकडे बालाजीचे मावंदे खायला गेला होता.  मावंदे जेऊन रात्री मांजरमहून निघून कहाळा मार्गे बरबड्याला जात असताना पुराचा अंदाज न आल्याने ओहळाच्या पुरात तवेरा गाडी घातली.

ओहळाच्या दुतर्फा  थांबलेल्या अनेक लोकांनी त्याला थांबायला सांगितले मात्र तो ओहोळ ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, वरून येणाऱ्या पुरातील पाण्याच्या वेगाने तवेरा गाडी पुलाखाली गेली. गाडीच्या खिडकीतील दरवाजातून पाणी गाडीत जाऊन तवेरा चालक बाबूशा उर्फ गंगाधर दिवटे ( वय 40 ), पारूबाई बाबूशा उर्फ गंगाधर दिवटे (वय 35),  अनुसया बाबूशा उर्फ गंगाधर दिवटे ( वय 6 मुलगी ) यांचा मृत्यू झाला.

रात्री उशिरा मयतांना बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नायगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दुसऱ्या एका घटनेत मांजरम ता. नायगाव येथील विनायाक बालाजी गायकवाड  (वय 30 ) हा तरूण सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नायगावच्या सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या बहिणीला जेवणाचा डबा देऊन गावाकडे मोटारसायकलवर आपल्या मित्रांना घेऊन  परतत असताना, मांजरम- नायगाव दरम्यानच्या ओहळाला पुर आल्याने गायकवाड हा मोटारसायकल काठावर ठेऊन पाण्याचा अंदाज घेण्यासाठी ओहळात उतरला असता ओहळातील पुराच्या पाण्याच्या वेगाने तो मित्रांसमोर वाहून गेला. पुढे बेंद्री गावच्या शिवारात त्याचा मृत देह आढळला.

Web Title: Four people have flowing in water at Manjram area