
अपघातात दोन बालकांसह चौघांचा मृत्यू
केज - कार व ॲपेरिक्षाच्या धडकेत रिक्षा चालकासह चार जण जागीच ठार तर दोन्ही वाहनांतील नऊ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. केज-अंबाजोगाई मार्गावरील होळ (ता. केज) गावानजीक गुरुवार (ता.२) सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
भरधाव कारने समोरून येणाऱ्या ॲपेरिक्षाला धडक दिली. यात ॲपेरिक्षाचा चुराडा झाला. या अपघातात रिक्षाचालक बालाजी संपत्ती मुंडे (वय-२८, रा.पिसेगाव, ता.केज), मच्छिंद्रसिंग चरणसिंग बोके (३५, रा. भवानी माळ, धारूर रोड, केज), प्रिया दीपक सिंग (२ वर्ष) व युवराज सिंग (१ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये कारमधील मंदा चिखलकर, रिक्षातील आलम सिंग टाक, हरजित सिंग बादल, दीपक सिंग डोके, रुद्रराज चिखलकर, वनिता चिखलकर, हिराजितसिंग बादल व अन्य दोघांचा समावेश आहे.
जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. मृत व जखमींच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
Web Title: Four People Including Two Children Died In The Accident
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..