esakal | Coronavirus : राज्यात तपासलेल्यांपैकी चार टक्के रुग्ण पॉझिटीव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-In-Maharashtra

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्चला आढळला. त्यानंतर महिन्याभरातच रुग्णांच्या संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला. राज्यात २६ जिल्ह्यांमध्ये या विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यातील कोरोनाबाधित १ हजार ५७४ रुग्णांच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. राज्यातील एक ते दहा वर्षे वयोगटातील ४८ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ६१ वर्षांवरील वयोगटात या विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ४१ ते ५० या वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ३२१ रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

Coronavirus : राज्यात तपासलेल्यांपैकी चार टक्के रुग्ण पॉझिटीव्ह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात तपासणी झालेल्या रुग्णांपैकी चार टक्के रुग्णांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला आढळला आहे. यात ६१ टक्के पुरुष तर ३९ टक्के महिलांचा समावेश आहे. यातच राज्यात ६.९८ टक्‍क्‍यांपर्यंत वाढलेला कोरोनाचा मृत्यूदर हे काळजीचे कारण ठरले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याच्या सार्वनजिक आरोग्य खात्यातर्फे कोरोना विषाणूच्या उद्रेकाची सविस्तर नोंद करण्यात येत आहे. त्या माहितीचे विश्‍लेषण करणारा अहवाल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने प्रसिद्ध केला. त्यात हे अधोरेखित करण्यात आले आहे. 

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्चला आढळला. त्यानंतर महिन्याभरातच रुग्णांच्या संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला. राज्यात २६ जिल्ह्यांमध्ये या विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यातील कोरोनाबाधित १ हजार ५७४ रुग्णांच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. राज्यातील एक ते दहा वर्षे वयोगटातील ४८ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ६१ वर्षांवरील वयोगटात या विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ४१ ते ५० या वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ३२१ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. 

स्त्रियांचे तुलनेत पुरुषांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे. राज्यातील रुग्णांमध्ये ६१ टक्के (९५४ रुग्ण) पुरूष आणि ३९ टक्के (६२० रुग्ण) महिला आहेत. कामानिमित्त बाहेर फिरणाऱ्या पुरुषांचे प्रमाण यात सर्वाधिक असल्याचे यातून दिसते. 
राज्यात शनिवारी सकाळपर्यंत ३१ हजार ८४१ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९६ टक्के रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यातील चार टक्के रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मृतांमध्ये पुरूष सर्वाधिक
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात आतापर्यंत ११० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात पुरुषांचे प्रमाण ६९ टक्के (७६) आणि महिलांचे ३१ टक्के  (३४) असल्याचे या विश्‍लेषणातून दिसते. 

loading image
go to top