Salman Khan Home Firing Case : बिष्णोई, ब्रार टोळीतील चार जणांना अटक; सलमान खानच्या घरावरील हल्ला प्रकरण

अभिनेता सलमान खानवर हल्ला करून त्याची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई व गोल्डी ब्रार टोळीतील चार आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.
Salman Khan Home Firing Case
Salman Khan Home Firing Casesakal

पनवेल : अभिनेता सलमान खानवर हल्ला करून त्याची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई व गोल्डी ब्रार टोळीतील चार आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. धनंजयसिंह तपेसिंग ऊर्फ अजय कश्यप (वय २८), गौरव विनोद भाटिया ऊर्फ न्हायी संदीप (वय २९), वस्पी मेहमूद खान ऊर्फ वसीम चिकना (वय ३६) व झिशान झकरुल हसन ऊर्फ जावेद खान (वय २५) अशी आरोपींची नावे आहेत.

या टोळीतील चौघांनी व इतर सदस्यांनी पाकिस्तानातून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मागवून सलमान खानची हत्या करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. या कटातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ २चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. सलमान खानला जीवे ठार मारण्याची धमकी देणारे लॉरेन्स बिष्णोई व गोल्डी ब्रार गँगमधील काही सदस्य हे पनवेल व कळंबोली परिसरात राहात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना गेल्या नोव्हेंबरमध्ये मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी आरोपींना विविध शहरांमधून अटक केली.

हल्ल्यासाठी शार्प शूटरची निवड

सलमान खानवर हल्ला करण्यासाठी या टोळीने १८ वर्षांच्या आतील मुलांचा वापर करण्याची तयारी केली होती. यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड व गुजरात याठिकाणी शार्प शूटर तयार ठेवले होते. विदेशात असलेल्या गोल्डी ब्रार, रोहित गोधारा आणि अनमोल बिष्णोई यांचे आदेश मिळाल्यानंतर ते सलमान खानवर हल्ला करणार होते. या कामासाठी गाडी पुरविण्याकरिता जॉन नावाच्या व्यक्तीची निवडदेखील केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर सर्वजण कन्याकुमारी येथे एकत्र जमून तेथून ते समुद्रमार्गे बोटीतून श्रीलंका येथे जाणार होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या देशामध्ये पाठविण्याची सर्व व्यवस्था अनमोल बिष्णोई याने केल्याचे तपासात आढळून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com