सोलापूर बार असोसिएशनसाठी यंदा चौरंगी लढत! आतापर्यंत २८ जणांनी घेतले अर्ज अन्‌ ‘या’ उमेदवारांनी भरले अर्ज; निकाल- मतमोजणी ‘या’ कारणाने लांबणार

येथील वकिलांच्या बार असोसिएशनसाठी २९ एप्रिल रोजी निवडणूक होत असून त्यातून २०२४-२५ या वर्षाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. आतापर्यंत २८ वकिलांनी अर्ज खरेदी केले असून त्यापैकी नऊ जणांनी अर्ज भरले आहेत. यंदाची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
advocate
advocatesolapur

सोलापूर : येथील वकिलांच्या बार असोसिएशनसाठी २९ एप्रिल रोजी निवडणूक होत असून त्यातून २०२४-२५ या वर्षाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. आतापर्यंत २८ वकिलांनी अर्ज खरेदी केले असून त्यापैकी नऊ जणांनी अर्ज भरले आहेत. यंदाची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विद्यमान अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.

सोलापूर बार असोसिएशएनसाठी यंदाच्या निवडणुकीत एक हजार ८३१ वकील सदस्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या निवडणुकीत ॲड. सुरेश गायकवाड यांनी बाजी मारली होती. यंदाची निवडणूक चौरंगी होणार असल्याने अर्जांची संख्या देखील वाढू शकते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ॲड. एस.व्ही. उजळंबे, ॲड. राजेंद्र फताटे, ॲड. अमित आळंगे व ॲड. एस.आर. रेशमे या चौघांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्यात ॲड. आळंगे व ॲड. उजळंबे यांच्यात कांटे की टक्कर होवू शकते, असे बोलले जात आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन १ मे रोजी होणार असून त्यासाठी उच्च न्यायालयाचे चार न्यायमुर्ती येणार आहेत. त्यामुळे बार असोसिएशन निवडणुकीची मतमोजणी २९ एप्रिलऐवजी २ मे रोजी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ ३ किंवा ४ मे रोजी होईल, असेही सांगितले जात आहे.

ठळक बाबी...

  • सदस्य नोंदणी किती : १८३१

  • उमेदवारी अर्जाची मुदत : १५ एप्रिल

  • अर्ज माघार : १९ ते २२ एप्रिल

  • निवडणूक : २९ एप्रिल (सकाळी साडेसात ते दुपारी साडेचारपर्यंत)

  • मतमोजणी : २ मे रोजी

बार असोसिएशन निवडणुकीतील आतापर्यंतचे अर्जदार

  • अध्यक्ष : एस.आर. रेशमे, राजेंद्र फताटे

  • उपाध्यक्ष : परवेज ढालायत

  • सचिव : श्यामराव बिराजदार

  • सहसचिव : मेघना मेलपद्दी, सुवर्णा शिंदे, नरेंद्र कुमार गावडे

  • खजिनदार : संतोषकुमार बाराचारे, प्रकाश अभंगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com