मुंबई विमानतळावर 44 हजार जणांची तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

पुणे -  "कोरोना' विषाणूच्या उद्रेकामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 44 हजार 517 प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या चीनसह इतर 24 देशांमधून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आतापर्यंत 279 प्रवासी आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"कोरोना'चा उद्रेक झालेल्या भागातून प्रवास करून आल्यानंतर 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळलेल्या प्रवाशांना राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत ठेवण्यात आले होते. राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत गेल्या महिनाभरात 77 जणांना दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत भरती केलेल्यांपैकी सर्व प्रवाशांचे प्रयोगशाळा नमुने "निगेटिव्ह' असल्याचा निर्वाळा पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था "एनआयव्ही' यांनी दिला. विलगीकरण कक्षांमध्ये ठेवलेल्या 77 प्रवाशांपैकी 73 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, सध्या मुंबई आणि पुण्यातील रुग्णालयात दोन जणांना विलगीकरण कक्षांत ठेवले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, वुहान शहरातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा 14 दिवसांकरिता करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 279 प्रवाशांपैकी 170 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला. मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, नगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यांतूनही चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fourtyfour passengers checked at Mumbai airport

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: