

Gadchiroli Tiger Attack
ESakal
अहेरी तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायत परिसरातील चिरेपल्लीच्या जंगलात ७६ वर्षांच्या शिवराम गोसाई बामनकर या वृद्ध गुराख्यावर वाघाने हल्ला केला. मात्र या वृद्धानेही प्राणाजी बाजी लावून वाघाशी झूंज देत अखेर त्या वाघाला पळवून लावले. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. तसेच भीतीचे वातावरण पसरले आहे.