
Solapur Gajanan Maharaj Palkhi Arrival: आषाढी वारीनिमित्त लाडक्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या शेगावीचा राणा संत श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी 'अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरुनाथ गजानन महाराज की जय' अशा जयघोषात सोलापूर जिल्ह्यात ४ वाजून ४० मिनिटांनी आगमन झाले. संत भेटती आजी मज, तेणे मी झालो चतुर्भुज ।। दोन्ही भुजा स्थळीं सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या, या माऊलींच्या अभंगाप्रमाणे संत भेटीचा सोहळा जिल्ह्यात आल्याने आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.