Gajanan Maharaj Prakat Din: गजानन महाराजांच्या 'गणगण गणात बोते' या मंत्राचा अर्थ काय? जाणून घ्या l Gajanan Maharaj Prakat Din Gan Gan Ganat Bote meaning | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gajanan Maharaj Prakat Din

Gajanan Maharaj Prakat Din: गजानन महाराजांच्या 'गणगण गणात बोते' या मंत्राचा अर्थ काय? जाणून घ्या

Gajanan Maharaj Prakat Din : माघ वद्य सप्तमी म्हणजे १३ फेब्रुवारी १८७८ रोजी गजानन महाराजपहिल्यांदा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथिल लोकांना दिगंबर अवस्थेत दिसले. महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याची दंतकथा आहे.

'गणगण गणात बोते'चा गजर करत अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात गजानन महाराज प्रकटदिन साजरा करण्यात येतो. महाराज अत्यंत परमोच्च स्थितीली पोहचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गुढच होते.

महाराज भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरुन भक्तांच्या हृदयात घर करत असा अनेक भक्तांचा अनुभव होता. 'गणगण गणात बोते' हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असायचे. त्यामुळेच गिणगिणे बाबा असंही त्यांना नाव पडलं होतं. तर वऱ्हाडातले भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाब म्हणत असे.

आपल्या अवतार कार्यातील ३२ वर्षांच्या काळात गजानन महाराजांनी संपूर्ण वेळ शेगावात घालवला. पण काही प्रसंगांनी अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या ठिकाणी भ्रमंती केली.

पंढरीला समाधीचा मानस

गजानन महाराज यांना पंढरीला समाधी घेण्याची इच्छा होती. मात्र विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचं ठरवलं. ऋषीपंचमीला सुर्योदयालाच महाराजांनी प्राण अनंतात विलीन केले. गजानन महाराज पालखीच्या माध्यमातून खेड्या-पाड्यापर्यंत पोहचले.

'गणगण गणात बोते' मंत्राचा अर्थ

गजानन महाराज कायम 'गणगण गणात बोते' या मंत्राचा जप करत असत. त्यामुळे त्यांचे भक्तही या मंत्राचा जप करतात. पण तुम्हाला या मंत्राचा अर्थ माहिती आहे का?

या मंत्राचा अर्थ होतो की, जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.