esakal | यंदा गणेश प्राण-प्रतिष्ठापना सकाळसोबत
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Pujan Live

तुमच्या घरच्या गणपतीची यथासांग पुजा व्हावी ही आमचीही ईच्छा आहे. आणि म्हणून  श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही सांगणार आहोत ऑनलाईन  पुजा....आमच्या वेबसाईटवरुन. तसेच 'सकाळ'च्या फेसबुक पेजवर सकाळी ७:३०, ९:३०, ११:३० व दुपारी १:३० वाजता लाईव्ह पूजा सांगितली जाणार आहे.  

यंदा गणेश प्राण-प्रतिष्ठापना सकाळसोबत

sakal_logo
By
रफिक पठाण

गणेशभक्तांनो....,

उद्या आपल्या लाडक्या  गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. बाप्पाचं स्वागत करायला तुम्ही सगळे उत्सुक असणार याची आम्हाला खात्री आहे. चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या श्री गणरायाचे आगमन वाजत गाजत-पै पाहुण्यांच्या उपस्थितीतच व्हायला हवे खरेतर, पण यावर्षी नाईलाज आहे आपल्या सगळ्यांचाच. कोरोनाच्या साथीमुळे आपल्याला आपल्या उत्साहाला आवर घालावा लागतोय.

पण प्रथेप्रमाणे बाप्पा घरी येणार. त्यांची यथासांग प्राण-प्रतिष्ठापनाही होणार. कशी? पुजा कोण सांगणार? गुरुजी येतील का? आमच्या वेळेत गुरुजी मिळतील का? असे अनेक सवाल तुम्हाला पडले असतील ना? पण काळजी करु नका.....सकाळ आहे तुमच्या सोबत.

तुमच्या घरच्या गणपतीची यथासांग पुजा व्हावी ही आमचीही ईच्छा आहे. आणि म्हणून  श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही सांगणार आहोत ऑनलाईन  पुजा....आमच्या वेबसाईटवरुन. तसेच 'सकाळ'च्या फेसबुक पेजवर सकाळी ७:३०, ९:३०, ११:३० व दुपारी १:३० वाजता लाईव्ह पूजा सांगितली जाणार आहे.  

 
उद्या श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी  पहाटे साडेचार वाजल्यापासून शूभ मुहुर्त सुरु होत आहेत. तेव्हापासून दुपारी दीड वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही आपल्या घरच्या श्री गणेशाची प्राण-प्रतिष्ठापना करु शकता. आमच्या वतीनं श्री. मंदार जोगळेकर गुरुजी तुम्हाला पुजा सांगतील. त्यासाठी साहित्य आणून ठेवा. पुजा मांडून ठेवा आणि फक्त आमच्या वेबसाईटवर- फेसबूक पेजवर जा आणि यथासांग पुजा करुन मांगल्याच्या देवतेचं स्वागत करा.

 
गणेशाच्या पूजेच्या व्हिडीओसाठी दिलेला क्युआर कोड स्कॅन करूनही तुम्ही लाईव्ह पूजा पाहू शकता.

loading image
go to top