esakal | आणखी किती निर्भया? चालत्या ट्रेनमध्ये पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

rape

पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरीजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई : माणुसकीला काळीमा फासणारी घटना लखनौहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरी रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडली आहे. आधी रेल्वेत लूट केली. त्यानंतर पतीसोबत प्रवास करणाऱ्या महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार केले.

आणखी किती निर्भया? पतीच्या समोरच अत्याचार

पीडित महिलेच्या नवऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण करून पतीच्या समोरच पत्नीला चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार करणयात आले. हे सर्व आरोपी नाशिकचे असल्याचं समोर आलं आहे. कसारा रेल्वे स्थानकावर उतरून आरोपी पसार झाले मात्र याच दरम्यान दोन आरोपीना प्रवाशानी मोठ्या धाडसाने पकडुन ठेवल. या प्रकरणी चौघांना रेल्वे पोलिसानी अटक केली आहे. पुष्पक एक्सप्रेसच्या डी ०२ बोगीमध्ये ही घटना घडली आहे. आरोपींनी तब्बल ९६ हजारांची लूट केली आहे

हेही वाचा: Chipi Airport Live: उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

शुक्रवारी (ता. ८) संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोचली असता इगतपुरी स्थानकातून आठ जण एक्स्प्रेसमध्ये चढले. एक्स्प्रेसने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी प्रवाशांना मारहाण करत महिलांची छेड काढण्यास सुरुवात केली. अनेक महिलांचा विनयभंग करित हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

१६ प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले त्यांच्याकडून मोबाईल व रोकड हिसकावून घेतली. दरोडेखोर इथेच थांबले नाही तर त्यांनी पती सोबत प्रवास करणाऱ्या वीस वर्षीय महिलेची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. तब्बल तासभर दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता.

आरोपींची नावे

या आठ आरोपींमधील सात जण घोटी परिसरात तर एक आरोपी मुंबई येथे राहणारा आहे.

१) प्रकाश पारधी २० (त्र्यंबकर रोड, इगतपुरी)

२) अर्षद शेख १९ (मालडचा राहणारा)

३) अक्कू (घोटी नाशिक)

४)पव्या (घोटी नाशिक)

५)काल्या (घोटी नाशिक)

६)गुड्या (टाकेत गाव)

७) राहुल (टाकेत गाव)

८) कळश्या (घोटी नाशिक)

हेही वाचा: Chipi airport: पवार-राणेंच्यामध्ये बसणार मुख्यमंत्री; पहा वादग्रस्त निमंत्रण पत्रिका

आळा बसणे ही काळाची गरज

आपण पाहिले तर अशा घटना कुठे ना कुठे आपल्या वाचनात येतात व एका बाजूने हजारो वर्षापासून सुसंस्कृतपणाची आपल्या देशाची परंपरा सांगणार्‍या देशात आता स्त्रियांवरील अत्याचारांची परंपरा जणू जन्माला घातली जात आहे. एकीकडे आपण महासत्ता होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहोत, तर दुसर्‍या बाजूने स्त्रियांवर अत्याचारांचे आक्रमण होत आहे. देशाची शान, देशाची मान राखण्यासाठी अशा अपमानकारक व लज्जास्पद घटनांना आळा बसणे ही काळाची गरज आहे. त्यासंबंधी संबंधितांनी गंभीरपणे विचार करणे आणि मुख्य म्हणजे कृती करणे गरजेचे आहे.

रेल्वे सुरक्षा बलचे कर्मचारी...आलेच नाहीत.

दरम्यान लांबपल्ल्याच्या रेल्वेमध्ये रेल्वे सुरक्षा बल, RPF चे कर्मचारी डब्ब्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घालण्यासाठी कार्यरत असतात; परंतु कार्यरत असलेले RPF, रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी एकच जागेवर बसून असतात. हा प्रकार झाला तेव्हा एकही कर्मचारी, TC प्रवाशांच्या मदतीला आला नाही.

''घटना घडल्यानंतर आम्ही घटनास्थळ न पाहता कल्याण जीआर मध्ये गुन्हा दाखल केला आहे. पिडीत महिलेची तब्येत स्थिर आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून आठ पैकी सात आरोपी घोटीचे राहणार आहे, तर एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत.'' - मनोज पाटील, DCP मध्य रेल्वे.

loading image
go to top