

Gas Supply
Esakal
पाली : ग्रामीण भागातील नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी करावी लागणारी पायपीट व सोसावा लागणारा विलंब आणि आर्थिक भुर्दंड थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या पाठपुराव्याला यश आले असून बुधवार (ता. 8) पासून गॅस एजन्सीमार्फत घरगुती सिलिंडर थेट प्रत्येक गावोगावी ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.