Gautami Patil : 'अरे थांबा रे!' गौतमी पाटीलचे चाहते चक्क स्टेजवरच चढले; कार्यक्रमात दगडफेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautami Patil
Gautami Patil : 'अरे थांबा रे!' गौतमी पाटीलचे चाहते चक्क स्टेजवरच चढले; कार्यक्रमात दगडफेक

Gautami Patil : 'अरे थांबा रे!' गौतमी पाटीलचे चाहते चक्क स्टेजवरच चढले; कार्यक्रमात दगडफेक

गौतमी पाटील हे नाव आता घराघरात पोहोचलं आहे. तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दीही नवीन नाही, मात्र तिच्या एका कार्यक्रमादरम्यान एवढी गर्दी झाली, की चाहते नियंत्रणाबाहेर गेले आणि त्यांनी राडा केला.

बीडमध्ये गौतमीचा डान्सचा कार्यक्रम होता. राजुरी इथल्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीचा डान्स पाहायला लोकांनी इतकी गर्दी केली की अक्षरशः रंगाचा बेरंग झाला.

गौतमीचे चाहते इतके अनियंत्रित झाले की शेकडो लोक थेट गौतमी नाचत असलेल्या स्टेजवरच चढले. बरं एवढंच नाही, तर या वेळी स्टेजवर दगडफेकही करण्यात आली. यामुळे आता गौतमी पाटील पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याच्या आरोपामुळे गौतमी पाटील चर्चेत आली होती. पण तरीही तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. तिच्या डान्सच्या व्हिडीओ क्लिपही व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी तिच्या एका कार्यक्रमात एका शाळेचा छत तुटलं होतं, तसंच एकाचा मृत्यूही झाला होता.

टॅग्स :Beed