
Gautami Patil : गौतमी पाटीलची सपशेल शरणागती; अजित पवारांना म्हणाली, दादा...
मुंबईः लावणीमध्ये अश्लील हावभाव केल्यामुळे गौतमी पाटील टीकेची धनी ठरली होती. मात्र मागील काही दिवसांपासून तिने तिच्या नृत्यामध्ये बदल केले आहेत. तरीही ट्रोलर्स तिला ट्रोल करतात. अजित पवार यांनीही याबाबत चार दिवसांपूर्वी भाष्य केलं होतं.
नेमका विषय काय?
राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार केली होती.
यानंतर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या, त्यानुसार, लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालण्यात येणार आहे. राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या.
गौतमी पाटील काय म्हणाली?
त्यानंतर आज गौतमी पाटीलने अजित पवार यांची थेट माफी मागितील. गौतमी म्हणाली की, दादा खूप मोठे आहेत. दादांना मी काही बोलू शकत नाही. माझं एकच म्हणणं आहे. मी माफी मागितली होती. माझ्याकडून चुका झाल्या. तरीही अजूनही लोक मला ट्रोल करीत आहेत. ते कोण आहेत, हे मला माहिती नाही. लोक माझे जुने व्हीडिओ टाकत आहेत. माझी प्रसिद्धी काहींना पहावत नाही, असं गौतमी म्हणाली.