Goutami Patil
Goutami PatilEsakal

Goutami Patil: गौतमी पाटील लावणी कार्यक्रम परिसरातच मृतदेह आढळल्याने खळबळ

कोल्हापुरची लावणी क्वीन आणि इस्टांस्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात गोंधळ
Published on

महाराष्ट्रात लावणी ही नृत्यकला फारच लोकप्रिय आहे. लावणीच्या कार्यक्रमात प्रेक्षक कायमच तुफान राडा करतात. मात्र यावेळी प्रेक्षकांनी कहरच केला. कोल्हापुरची लावणी क्वीन आणि इस्टांस्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात हा सर्व प्रकार घडला. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी गौतमीच्या लावणीचा कार्यक्रम होता. तिची लावणी पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झाली. त्यातच काही प्रेक्षक जिल्हा परिषद शाळेच्या कौलारु छतावर जाऊन बसलेच नाही तर तिथे नाचूही लागले यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या छताचा पार चुराडा झाला इतकचं नव्हे तर जागा नसल्याने झाडावर प्रेक्षक बसल्याने अनेक झाडेही कोसळली.

आश्चर्याकारक गोष्ट म्हणजे ज्या परिसरात लावणी कार्यक्रम होता त्याचं परिसरातच एक मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली. सांगली जिल्ह्यातील बेडग या ठिकाणी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान सत्कार समारंभानंतर लावणीचा कार्यक्रम होणार होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली.

Goutami Patil
Gautami Patil: गौतमीची लावणी, झेडपीची शाळा हलली!

लावणी कार्यक्रमावेळी काही प्रेक्षक गावातील जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढले. यामुळे शाळेच्या कौलारु छताचा चुराडा झाला. शाळेची कौलं फुटून मोठं नुकसान झालं. तार जाळीच्या कपांऊंडलाही याचा फटका बसला. त्यामुळे आता झालेल्या शाळेच्या नुकसानीला जबाबदार कोणं, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Goutami Patil
Gautami Patil: कोल्हापूरकरांच्या हृदयातली लावणी क्वीन गौतमी पाटील आहे तरी कोण...

या कार्यक्रमाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आश्चर्य म्हणजे शाळेतील शिक्षकच या कार्यक्रमात ठुमके लगावताना दिसून आले. दरम्यान संबधित आयोजक आणि शिक्षकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केली. दरम्यान याच कार्यक्रमाच्या परिसरात एक मृतदेहदेखील संशयास्पदरीत्या आढळून आला होता. दत्तात्रय विलास ओमासे नावाची व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. मृत दत्तात्रय विलास ओमासे हे गर्दीत तुडवले गेले असण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या मृत्यूप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com