
पुणे स्टेशनवर जिलेटीनच्या कांड्या सापडल्या? काय असतात Gelatin Sticks?
पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता जिलेटीनच्या कांड्यासदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) ही वस्तू ताब्यात घेतली. यानंतर तत्काळ प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर वाहतूक थांबवण्यात आली आहे. परंतु ज्या जिलेटीनच्या कांड्या असल्याच्या संशयावरून या सगळ्या गोष्टी घडल्या, ते जिलेटीन नेमकं असते तरी काय? (Explosive Found on Pune Railway Station)
हेही वाचा: Hingoli | हिंगोलीत पोलिसांची मोठी कारवाई, जिलेटीन अन् डिटोनेटर जप्त
काय असतात जिलेटीनच्या कांड्या? ( What is Gelatin Stick?)
जिलेटीनच्या कांड्यांचा वापर स्फोटक म्हणून केला जातो. विशेषतः खाणकाम, विहिरी खणणं, रस्ते किंवा इतर कामांदरम्यान अडथळा ठरणारे मोठमोठे दगड किंवा खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो. यामध्ये मोठे होल किंवा छिद्र करून त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या जातात, त्यानंतर लांबून वात पेटवून स्फोट घडवून आणला जातो.
जिलेटीनच्या कांड्या किती विध्वंसक? (How Dangerous Gelatine is?)
जिलेटीनच्या कांड्या या फार विध्वसंक असतात. एका जिलेटीनच्या कांडीच्या स्फोटामध्ये मोठमोठ्या गोष्टी उध्वस्त होऊ शकतात. हा स्फोट इतका भयंकर असतो की यामध्ये महाकाय दगडांच्या चिंधड्या उडतात. मात्र कधी कधी जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट होऊन दुर्घटनाही घडल्या आहेत. यात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर कधीकधी विकृत प्रवृत्तीचे लोक जाणून बुजून जिलेटीन कांड्यांचा वापर करून विध्वंस घडवतात.
हेही वाचा: जिलेटीन स्फोटकाच्या साठाप्रकरणी वाळव्यातील एकास अटक
मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडल्या होत्या जिलेटीनच्या कांड्या-
दरम्यान गतवर्षी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटालिया या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या 20 कांड्या सापडल्या होत्या. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.
Web Title: Gelatin Stick Found At Pune Station How Dangerous Gelatine Is
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..