Vidhan Sabha 2019 : भाजप आणि शिवसेनेला शेतीची अक्कल नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना शेतकऱ्यांची तळमळ दिसत नाही, त्यांनी शेतीची अक्कल नाही. कांद्याची निर्यात बंद शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैसे मिळू दिले नाहीत. ही तुमची शेतकऱ्यांची धोरणे आहेत का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला.

पारनेर : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना शेतकऱ्यांची तळमळ दिसत नाही, त्यांनी शेतीची अक्कल नाही. कांद्याची निर्यात बंद शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैसे मिळू दिले नाहीत. ही तुमची शेतकऱ्यांची धोरणे आहेत का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून (मंगळवार) सुरवात झाली आहे. पारनेर येथे आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी ईडीच्या कारवाईवरून भाष्य केले. तसेच सरकारलाही लक्ष्य केले.

शरद पवार म्हणाले की, या निवडणुकीला आम्ही खूप महत्त्व दिले आहे. कारण, गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राचा कारभार अशा लोकांच्या हातामध्ये आहे ज्यांनी राज्यातील जनतेसाठी काहीच केले नाही. परिवर्तनासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. पारनेरला दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे येथील नागरिकांना नोकरीसाठी बाहेर जावे लागले. मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीच्या केलेल्या घोषणेचे काय केले. अद्याप 69 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. अशा सत्ताधाऱ्यांनी आपण मत दिले पाहिजे का असा सवाल पवार यांनी केला. यावेळी बाेलताना त्यांनी सरकारच्या शेतीविषय़क धाेरणांना लक्ष्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: General feeling is fadnavis government has ignored core issu says sharad pawar