मोठी बातमी! आता अवघ्या १२०० रुपयांत म्युकरमायकोसिसचं इंजेक्शन; वर्ध्यात होणार निर्मिती

मोठी बातमी! आता अवघ्या १२०० रुपयांत म्युकरमायकोसिसचं इंजेक्शन; वर्ध्यात होणार निर्मिती

वर्धा : येथील सेवग्रामस्थित जेनेटिक लाईफ सायन्सेस (Genetic Life Science) या कंपनीला प्रारंभी रेमडिसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir availability) बनविण्याची परवानगी मिळाली होती. या परवानगीअंती गुरुवारी १७ हजार इंजेक्शनची येथून पहिली खेप रवाना झाली. हे औषध शासनापर्यंत पोहोच नाही तोच या कंपनीला एम्फोटेरेसिन बी (amphotericin b) हे इंजेक्शन निर्माण करण्याची परवानगी मिळाली आहे. सध्या वाढत असलेल्या म्युकरमायकोसिस (mucormycosis) या आजारावर हे औषध काम करणारे आहे. (Genetic Life Science got permission production of injection against mucormycosis)

मोठी बातमी! आता अवघ्या १२०० रुपयांत म्युकरमायकोसिसचं इंजेक्शन; वर्ध्यात होणार निर्मिती
नागपूरकरांनो, कोरोना लसीचा दुसरा डोस हवाय? जाणून घ्या तुमच्या घराजवळील केंद्रांची यादी

उपचारांती कोरोनवर मात करणाऱ्या अनेक रुग्णावर बुरशिजन्य आजाराचे आक्रमण होत आहे. यातिलाच एक म्युकर मायकोसिस हा आजार आहे. या आजारामुळे कायमचे अंधत्व येण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या या आजारावर उपयोगी ठरते असणाऱ्या एम्फोटेरेसिन बी या औषधाची मागणी वाढली आहे. मागणी वढताच त्याच्या किमतीही वाढल्या आहेत.

याच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचे लक्षात येताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यातील सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला एम्फोटेरेसिन बी हे औषध बनविण्याची परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यात त्यांना यशही आले. या कंपनीतून येत्या १५ दिवासात या औषधीचे उत्पादन सुरू होणार आहे.

१२०० रुपयात मिळणार इंजेक्शन

सध्या एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन सात हजार रुपयांच्या मिळत आहे. तर काहि ठिकानी त्याची किंमत सध्य 40 ते 50 हजार रुपये आहे. त्यामुळे वर्ध्यात आता रेमडीसीविर इंजेक्शन पाठोपाठ एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन उत्पादन येत्या 15 दिवसानंतर सुरू होणार आहे. त्यांची किंमत एक हजार 200 रुपये राहणार आहे.

मोठी बातमी! आता अवघ्या १२०० रुपयांत म्युकरमायकोसिसचं इंजेक्शन; वर्ध्यात होणार निर्मिती
मंत्र्यांनी चक्क प्रशासनालाच ठरवलं खोटं; म्हणतात, 'सोयाबीन नुकसानाच्या प्रस्तावाबाबत अनभिज्ञ'

रोज २० हजार इंजेक्शन

सेवाग्राम येथील या कंपनीत सध्या रेमाडिसिव्हीरचे उत्पादन सुरू आहे. त्या सोबतच एम्फाटेरेसिन बी या औषधाची निर्मिती सुरू करण्यात येणार आहे. येथे एका दिवसाला २० हजार इंजेक्शन तयार होतील अशी माहिती कंपनीच्या वतींर देण्यात आली आहे.

(Genetic Life Science got permission production of injection against mucormycosis)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com