सामान्यांना पुन्हा झटका! गोकूळ दूधाच्या किमती 4 रुपयांनी वाढल्या

milk
milkesakal

गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसत आहेत, सतत वाढत गेलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव यातच आता सामान्यांना आणखी अडचण वाढणार आहे, गोकुळने आपल्या दूध विक्री किंमतीत चार रुपयांची वाढ केली आहे.

गोकूळ संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गोकूळ दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता गोकूळ दूधसंघानं दुधाच्या दरात 4 रुपयांनी वाढ केली आहे शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याचं कारण देत दरवाढ लागू करण्यात आली आहे त्यामुळे आता गोकूळल्या म्हशीच्या दुधाची किंमत 58 रुपये प्रतिलिटर झाली असून, हे दर उद्या 16 एप्रिलपासून म्हणजेच (15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून) लागू होणार आहेत.

दरम्यान गोकुळच्या फुल क्रिम, प्रमाणित, गाय आणि टोण्ड दुधाच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. गोकुळचे फुल क्रिम दूध (1 लिटर) 58 रुपये दराने आणि फुल क्रिम दूध (500 मिली) 29 रुपये दराने मिळणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अमूल , पराग आणि नंतर मदर डेअरीने दुधाचे दर लिटरमागे दोन रुपयांनी वाढवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com