महाराष्ट्रातील सुवर्णकार २३ ऑगस्टला संपावर

दागिन्यांवरील हॉलमार्किंग युनिक आयडी (एचयुआयडी)मध्ये झालेल्या बदलांच्या निषेधार्थ राज्यातील सुवर्णकार २३ ऑगस्ट रोजी संप करणार
Strike
StrikeSakal

पुणे - दागिन्यांवरील (Jewelers) हॉलमार्किंग (Hallmark) युनिक आयडी (एचयुआयडी) (HUID) मध्ये झालेल्या बदलांच्या निषेधार्थ राज्यातील सुवर्णकार २३ ऑगस्ट रोजी संप (Strike) करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका यांनी शुक्रवारी जाहीर केले.

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस) शुद्धतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किंग कायदा अमलात आणला. देशातील असंख्य ज्वेलर्सने कायद्याचे स्वागत केले. आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी चांगल्या योग्य पद्धतीने होत होती. परंतु बीआयएसने शुद्धतेच्या निकषांत बदल केले. सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता प्रमाणे हॉलमार्किंगमध्ये बदल केले. त्याचा ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही त्रास होणार आहे. त्यामुळेच या दोन्ही स्तरावर विरोध होत असून त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र सराफ सुवर्णकार 23 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहे.

Strike
राष्ट्रवादीच्या उदयानंतर खरंच जातीवाद उदयास आला? समजून घ्या

यापूर्वी दागिन्यांवर हॉलमार्क करताना हॉलमार्क सेंटर लोगो, ज्वेलर्सच्या दुकानाचे नाव किंवा लोगो छापला जात होता. त्यामुळे कोणत्या हॉलमार्क सेंटरवर शुद्धता तपासली गेली व कोणत्या दुकानामधून ग्राहकाने माल खरेदी केला, हे ग्राहकाला समजत होते. काही कारणास्तव दागिन्यांची पावती हरवल्यास दुकानाच्या शिक्क्यावर दागिने परत खरेदी करताना किंवा दागिने मोडताना व्यापारी सहज व्यवहार करीत होते. परंतु नवीन पद्धतीने दागिने वरचे हॉलमार्क सेंटर दुकानाचा लोगो काढून टाकले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात कोणत्या दुकानातून माल घेतला आहे, हे समजणे अशक्य होणार आहे. ‘एचयुआयडी’ध्ये सहा आकडी नंबर असून त्यावर ग्राहकाचे नाव व मोबाईल क्रमांक सहित माहिती ‘बीआयएस’ पोर्टलवर कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे ग्राहक व व्यापारी यांची गोपनीयता धोक्या येत असून हा व्यवसायात थेट हस्तक्षेप आहे. तसेच यामुळे दागिन्यांची किंमत ही वाढणार आहे असून त्याचा भुर्दंड ग्राहकांना पडणार आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी सुवर्णकार संपावर जाणार असल्याचे ॲड. रांका यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com