.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण सध्या ९४ टक्के भरले असून धरणात एकूण ११४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वर्षभराची जिल्ह्याची चिंता आताच दूर झाली आहे. सध्या दौंडवरून उजनीत २० हजार क्युसेकची आवक असल्याने धरणातून भीमा नदीत १५ हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला असून विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडले आहे.
२७ मेपर्यंत उणे पातळीत असलेले उजनी धरण सव्वा महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात दौंड व स्थानिक पावसाची आवक जास्त असल्याने आतापर्यंत धरणातून सुमारे २० टीएमसी (४० टक्के) पाणी भीमा नदीतून सोडून देण्यात आले आहे. सध्या उजनीतून कॅनॉलद्वारे १९०० क्युसेक, बोगद्यातून ४०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून ८०० क्युसेक आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ८० क्युसेकचा विसर्ग सोडला आहे. दौंडवरून मोठी आवक जमा होत असल्याने गुरुवारी (ता. १०) उजनीतून भीमा नदीत सोडलेला विसर्ग पाच हजार क्युसेकने वाढविला आहे.
पावसाळा आणखी दोन-अडीच महिने असल्याने उजनीचा पाणीसाठा ९२ ते ९४ टक्क्यांपर्यंत ठेवला जात आहे, जेणेकरून आगामी काळात दौंडसह स्थानिक विसर्ग वाढल्यास खूप मोठा विसर्ग नदीतून सोडावा लागणार नाही. मागील २० दिवसांपासून कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे, पण बहुतेक शेतकरी ते पाणी घेत नाहीत. त्यामुळे ते पाणी आहे तसे नदीला जाऊन मिळत असल्याची स्थिती आहे.
नदी काठी सतर्कतेचा इशारा
उजनी धरणातून भीमा नदीत सध्या १६ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. दौंडवरून उजनी धरणात मोठा विसर्ग जमा होत असल्याने उजनी धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब मोरे यांनी नदी काठावरील शेतकऱ्यांना, रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेला विसर्ग एक-दोन दिवसांत आणखी पाच हजार क्युसेकने वाढू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.