esakal | रंगकर्मींसाठी खुशखबर! नाटकाची तिसरी घंटा नोव्हेंबरला वाजणार
sakal

बोलून बातमी शोधा

रंगकर्मींसाठी खुशखबर! नाटकाची तिसरी घंटा नोव्हेंबरला वाजणार

आज महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्यासाठी रंगकर्मीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

रंगकर्मींसाठी खुशखबर! नाटकाची तिसरी घंटा नोव्हेंबरला वाजणार

sakal_logo
By
जयसिंग कुंभार,, प्रमोद हर्डीकर

सांगली : अखेर येत्या रंगभुमी दिनी (Theater Day 2021) 5 नोव्हेंबरला राज्यभरातील रंगमंच खुले होणार आहेत. आज महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्यासाठी रंगकर्मीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष नवनाथ मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघ अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटना अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे आदी उपस्थित होते. रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे यांनी भेट घडवून आणली.

हेही वाचा: कोरोना मृतांच्या वारसांना मदत कधी देणार? SC ने केंद्राला फटकारले

यावेळी आदेश बांदेकर, सुबोध भावे हे कलाकारही उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत आज हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नाट्यगृह ५० % प्रेक्षक उपस्थितीमध्ये ५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू करण्याचे आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आले.

कोरोनाकाळात (covid-19) रंगभूमी लॉक झाली. रंगभूमीशी संबधीत कलाकार, पडद्यामागचे कलाकार, रंगमंच कर्मचारी यांना अडचणींचा सामोरे जावे लागले. ऐन सिझनला प्रयोग बंद झाल्याने नाट्यसृष्टीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. आता ५ नोव्हेंबरला नाटकाची तिसरी घंटा वाजणार असुन पुन्हा एकदा रंगभूमी रसिकांच्या स्वागताला सज्ज होणार आहे.

हेही वाचा: "तुमचं कोणत्या शब्दात कौतुक करावं.." CM ठाकरेंचा कल्पिता पिंपळेंना फोन

loading image
go to top