
आपल्या वडिलांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा खास दिवस म्हणजे ‘फादर्स डे’! फादर्स डेच्या निमित्ताने गुगलने खास डुडल तयार केले आहे.
त्यात दोन ग्रीटिंग कार्ड असून त्यातील पहिल्या कार्डमध्ये दोन पक्षी जात आहे. तर दुसरा कार्ड बंद आहे. तसेच त्यांमध्ये पताके, गुंडी, कात्री, सिसपेन्सिल, हृदय, रिबीन या अनेक वस्तू तिथे दिलेल्या आहेत. या सर्व वस्तू एकत्र करून आपल्या वडीलांसाठी छान ग्रीटिंग कार्ड तयार करून तो कार्ड फेसबुक, ट्विटर आणि https://g.co/doodle/4dmhmjs या वेबसाईटवरही ते ग्रीटिंग कार्ड पुढे पाठवता येतो. गुगलच्या या डूडलला क्लिक केल्यानंतर एक व्हिडीओ ओपन होतो. या खास गुगल डूडलमध्ये एका व्हिडीओच्या माध्यमातून या व्हिडीओमध्ये वेगवेगळे या पद्धतीने वडिलांबद्दल असलेले प्रेम, आदरातिथ्य भावना, आपुलकी आपल्या मुलांनी आपल्या हातून कार्ड तयार करण्यासाठी खास गुगलने हा खास डुडल तयार केलं आहे. फादर्स डे निमित्ताने गूगलने शुभेच्छा देणारे डूडल तयार केले आहे. वडिल आणि मुलाच्या नातेसंबंध उलगडणारे हे खास डुडल आहे. आपल्या वडिलांसोबत त्यांची मुलांची असलेली भावना व्यक्त करण्यासाठी गुगलने अशी ही मांडणी केलेली आहे. जगभरात फादर्स डे साजरा केला जातो. मुलांसाठी या औचित्याने आपले वडिलांविषयी असणारे प्रेम, आदरभाव व्यक्त करण्याचा हा दिवस होय. गुगल डुडलकडून फादर्स डेनिमत्तानं खास डुडल करण्यात आलं आहे. या डुडलमध्ये ग्रीटिंग कार्ड्स, पताके, गुंडी, कात्री, सिसपेन्सिल, हृदय, रिबीनयासगळ्या गोष्टी एकत्र करून नवीन ग्रीटिंग कार्ड साकारण्यासाठी मुलांना प्रोत्साहित केले आहे.
गुगलने याआधी देखील अनेक डूडल तयार केले होते. या डूडलद्वारे गुगलने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले होते. यात गुगलने तयार केलेल्या डूडलचे प्रत्येक अक्षर हे घरामध्येच राहून कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक कामात व्यग्र असल्याचा संदेश देत होते. नेहमीच गुगल आपल्याला अनेक वेगवेगळ्या पद्धतीने संदेश आणि आवाहन करत असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.