
Monsoon Session 2025: भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. विधानभवनाच्या लॉबीमध्येच दोन्ही गट भिडल्याने तणाव निर्माण झाला होता. विधानभवनात अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडणं निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.