esakal | ‘गवारी’ म्हटलं की दिसते शेंग, पण ही तर गवारी वेगळीच...
sakal

बोलून बातमी शोधा

goregaon

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गोरेगाव हे गाव आहे. गोरेगावपासून खेड तालुका सुमारे ८० किलोमीटर आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम ४५० ते ५०० आहे. हे गाव पूर्ण आदिवासी गाव आहे. त्यापैकी ८० टक्के लोक गवारी आडनावाचे आहेत. म्हणून गावाचे नाव 'गोरेगाव' पडले आहे.

‘गवारी’ म्हटलं की दिसते शेंग, पण ही तर गवारी वेगळीच...

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : 'गवारी' म्हणलं तरी साहजिकच डोळ्यासमोर येते ती कोवळी हिरवीगार गवारीची शेंग...  बरोबर ना? वाटलंच मला असच झालं असेल. पण ही कहाणी आहे ती 'गवारी'ची नसून एका डोंगराळ भागात वसलेल्या गावातील राहणाऱ्या नागरिकांच्या आडनावाची आहे. आता तुम्ही म्हणाल की असं कुठे आडनावं असतं का..? असंच तुम्हाला जो प्रश्न पडला तो सुरुवातीला मलाही पडला होता. पण ते खरं आहे. त्या गावात राहणाऱ्या गवारी आडनावांच्या काही रंजक गोष्टी आहेत.

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गोरेगाव हे गाव आहे. गोरेगावपासून खेड तालुका सुमारे ८० किलोमीटर आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम ४५० ते ५०० आहे. हे गाव पूर्ण आदिवासी गाव आहे. त्यापैकी ८० टक्के लोक गवारी आडनावाचे आहेत. म्हणून गावाचे नाव 'गोरेगाव' पडले आहे. या गावात गवारी, लाडके, भागीत, चिंटे, रावळ, वाजे आदी इतकी आडनावांची लोक राहतात. 

गवारी आडनाव ऐकल्यावर असं वाटतं असेल की हे लोक गवारी शेंग विकत असतील. किंवा त्यांची गवारीची शेती असेल पण तीळमात्र सुद्धा असं काहीच नाही आहे. गवारी शेंग आणि गवारी आडनावाचे काहीच संबंध नाही आहे. या गावातील ७०-८० टक्के लोक शिक्षित आहेत. पुरुषांसोबत महिला ही घरासाठी हातभार म्हणून बचतगट चालवतात, कुक्कुटपालन व्यवसाय करतात. आणि शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय ही करतात. या गावातील काही रहिवासी कामासाठी मुंबईला जाणून राहिलेले आहेत.   

खेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धारकृष्ण गवारी म्हणाले की, गोरेगाव या गावातील ७०-८० टक्के लोकांची आडनावे हि गवारीच आहेत त्यामुळे या गावाला गोरेगाव असे नाव पडले आहे. या गावात पूर्णतः आदिवासी समाज राहतो आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गोरेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील डोणी या गावातसुद्धा ३०-३५ लोक हे गवारी आडनावांची राहतात.  

म्हणून गावाचे असे नाव पडले...  

पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतांच्या डोंगररांगमधील वसलेले हे गोरेगाव. या गावात सुरुवातीपासून गवारी आडनावाची लोक राहत असल्यामुळे या गावाचे नाव गोरेगाव पडले आहे,असे सांगितले आहे. 

या गावातील लोक हे काम करतात... 

गोरेगाव गावातील लोक हे 12 महिने पूर्णतः शेती व्यवसाय करतात. उन्हाळ्यामध्ये गहू आणि बाजरीचे पीक घेतात तर पावसाळ्यात भाताची शेती करत असतात. शेतामध्ये काम करताना पुरुष आणि महिला दोघेही मिळून काम करतात. 

या गावातील मंदिरे... 

गोरेगाव गावातील लोकांचे मूळ कुलदैवत हे भैरवनाथ मंदिर आहे. चैत्र महिन्यात या गावात सात दिवस भैरवनाथची यात्रा भरते. त्या दिवसात हरिनामसप्ताह असतो. तसेच हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर आणि मुक्ताईचे मंदिर आहे.  

हे आहे गावात... 

गोरेगाव मध्ये जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, व्यायामशाळा, घरोघरी पाणी पुरवठा केला जातो आणि गावातील रस्ते हे पूर्णतः कॉक्रीटीकरण केलेले आहेत. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा गोरेगाव गावात आहे.