
Beed Crime News: परळी तालुक्यातील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्तेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत, मात्र अद्यापही तो फरार आहे. याचदरम्यान, गोट्या गित्तेचे अनिल उर्फ आप्पा दळवीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये आप्पा दळवी हादेखील गोट्याचा 'गॉडफादर' असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.