
नागपूर : देशात कापूस उत्पादकता वाढीसाठी निर्यातीला चालना मिळावी या उद्देशाने फायबर ते फॅशन या संकल्पनेतील पाच ‘एफ’वर कामावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कापसातील प्रक्रियेदरम्यान दर्जा सुधारावर भर देत देशभरातील १००० जिनिंगच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे. त्याकरिता प्रति जिनिंग सुमारे ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी दिली.