
अविनाश साबापुरे
यवतमाळ : एकीकडे आठ हजार गावात शाळाच नसल्याची बाब ऐरणीवर आहे. तर दुसरीकडे सरकारी आणि अनुदानित शाळांतून तब्बल तीन लाख विद्यार्थी घटल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. मोफत पाठ्यपुस्तके वाटप करताना ही आकडेवारी पुढे आल्याने शालेय शिक्षण खात्याची यंत्रणा चांगलीच पेचात पडली आहे.