
कोल्हापूर : यंदाच्या साखर हंगामात दहा लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारने आज परवानगी दिली आहे. त्याचबरोबर इथेनॉलच्या निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला प्रती किलो २८ रुपये दराचा २४ लाख टन तांदूळ प्रती किलो २२.५० रुपये दराने देण्याचाही निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे.