सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात; दिवाळीपूर्वी पगाराचा निर्णय रद्द

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनचा निर्णय अधांतरीच
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचे वेतन 24 आॅक्टोंबर पुर्वीच मिळावे अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून केल्या जात आहे. मात्र अद्याप एसटी महामंडळाने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याने, एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवळीवरही संक्रात येणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मुंबई : दिवाळी पुर्वी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार देण्याचा शासनाचा 9 ऑक्टोबरचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. राज्याच्या लेखा कोषागार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या कामात गुंतवल्याने, कोषागारातील अपुर्ण मनुष्यबळ असल्याचे लेखा कोषागार विभागाच्या संचालकांनी, वित्त विभागाला कळवल्याने दिवाळीपुर्वीचे वेतन मिळण्याचा निर्णय रद्द केला आहे. 

राज्यातील निवडणूकीच्या कामात अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याने, निवडणूकीनंतर येणाऱ्या दिवाळीसाठी या महिन्याचा पगार 24 ऑक्टोबर पुर्वीच करण्याचा राज्य शासनाने आदेश काढले होते. त्यासाठी लेखा कोषागार विभागाला कळवण्यात आले होते. या आदेशानंतर निवडणूकीच्या ताणतणावात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र 11 ऑक्टोबर रोजी दिवाळी पुर्वीच्या वेतन देयकाच्या आदेशाला कोषागारातील अपुऱ्या मनुष्यबळामूळे रद्द करण्यात आल्याने, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. 

या कर्मचाऱ्यांना मिळणार होता लाभ
जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक

एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनचा निर्णय अधांतरीच
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचे वेतन 24 आॅक्टोंबर पुर्वीच मिळावे अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून केल्या जात आहे. मात्र अद्याप एसटी महामंडळाने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याने, एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवळीवरही संक्रात येणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government decide not advance payment to employees before diwani