कर्मचाऱ्यांना सरकारचा दिलासा; लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीवेतनधारकांसाठी घेतला ‘हा’ निर्णय

Government decision on salaries of retired employees against the backdrop of Corona lockdown
Government decision on salaries of retired employees against the backdrop of Corona lockdown

सोलापूर : देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसमान्यांसह कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. मार्च, एफ्रिल व मे या तीन महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ना देय प्रमाणपत्र मिळत नसल्याने निवृत्तीवेतन मिळण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारच्या संबंधित विभागाकडून कागदपत्रांची पुर्तत: केल्यानंतर ईमेलवर ना देय प्रमाणपत्र पाठवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सरकारच्या सहकार, पणन वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी सरकारच्या गटविमा योजनेअंतर्गत घरबांधणीसाठी कर्ज घेतात. सहकारी गृहनिर्माण संस्थांना घरबांधणीसाठी कर्ज दिले जाते. त्याची व्याजासह वसूली कर्जाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर दोन वर्षांनी महिन्याला वेतनातून घेतला जातो. हा हप्ता सेवाचा कालावधी पाहून ठरवला जातो. जे कर्मचारी सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत कर्जाची परतफेड करत नाहीत तोपर्यंत त्यांना ना देय प्रमाणपत्र दिले जात नाही. आणि हे प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांना निवृत्तीवेतन दिले जात नाही. त्यामुळे काहीजण सेवानिृत्त दिनांकापूर्वी संबंधित कार्यालयातून चलन घेऊन कर्ज व त्यावरील व्याज मुंबई येथील भारतीय रिझर्व बँकेत भरुन चलन सादर करतात. त्यानंतर त्यांना ना देय प्रमाणपत्र दिले जाते.

हे प्रमाणपत्र असल्याशिवाय निवृत्तीवेतन मिळत नाही. मात्र यावर्षी देशासह महाराष्ट्रात करोना व्हायरसने थैमान घातला आहे. त्याला रोखण्यासाठी २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे शासकीय कार्यालयेसुद्धा व्यवस्थित सुरु राहू शकली नाहीत. याचा परिणाम अनेक घटकांवर झाला. या कालावधीत म्हणचे मार्च, एफ्रिल व मेमध्ये सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ना देय प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या. राज्यातील कानापोपऱ्यातून कर्मचारी या प्रमाणपत्रासाठी सहकार, पणन व वस्त्र उद्योगाच्या कार्यालयात संपर्क साधतात. पण वाहतुक बंद असल्याने व जिल्हा बंदी असल्याने यात अडचणी येत आहेत.

सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली असली तरी मुंबईतील न्यू इंडिया एश्‍युरंन्सच्या व्यवस्थापनाने ३० जूनपर्यंत कर्ज धारकांना प्रवेश नसल्याचे जाहीर केले आहे. आरबीआयनेही सर्व व्यवहार चेकद्‌वारे सुरु केले आहेत. मात्र, अनेक कर्मचारी रोख रक्कम घेऊन येतात. त्यामुळे अडचणी येत आहेत. अशा अनेक कारणांमुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळण्यास उशीर होत आहेत. 

कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त वेतन लवकर मिळावे म्हणून संबंधीत सभासदांनी त्यांच्या वसूलीची माहिती व सरकारकडून गटविमा योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची माहिती त्यांच्या कार्यालय प्रमुखाच्या सहीने कार्यालयीन मेलवर पाठवावी, असे आवाहन केले आहे. त्यानंतर ना देय प्रमाणत्र कार्यालयाच्या ई- मेलवरती पाठवले जाणार आहे. याची प्रत संबंधीत गृहनिर्माण संस्थेला देण्याची जबाबदारीही संबंधीताची राहणार आहे. संबंधित कर्मचाऱ्याला देय असलेली रक्कम सरकारच्या GRASS या प्रणालीमार्फत अदा करण्याचे आवाहन केले आहे. संबंधीतांनी ashokbhujbal03@gmail.com यावर माहिती पाठवण्याचे आवाहन परिपत्रकाद्‌वारे कक्ष अधिकारी अशोक भुजबळ यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com