
पाली : देशातील विविध कामगार-कर्मचारी संघटनांनी बुधवारी (ता. 9) देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रातील कर्मचारी सुध्दा या दिवशी सर्व जिल्ह्यात मोर्चा आयोजित करुन आंदोलन करणार आहेत. रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे संघटना सदन, मारुती नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.