दोन लाखांची कर्जमाफी म्हणणाऱ्या सरकारनेही शेतकऱ्यांवर घातली 'ही' बंधने

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 December 2019

२ लाखापेक्षा अधिक कर्ज असणार्या कर्जदारांना २ लाखापर्यंतचाही लाभ मिळणार नसल्याची अट घालून राज्य सरकारने स्वतःच्याच महत्वाकांक्षी योजनेचे पंख छाटले आहेत. 
 

मुंबई : महाविकास आघाडीने जाहीर केलेली महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेत अटीशर्तींची जाचक बंधनं असणार नाहीत असा दावा सरकारतर्फे केला जात होता. कर्जमाफीच्या ही योजना २ लाखापर्यंत मुद्दल आणि व्याजासह थकीत असणार्या कर्जासाठी असणार आहे. परंतू २ लाखापेक्षा अधिक कर्ज असणार्या कर्जदारांना २ लाखापर्यंतचाही लाभ मिळणार नसल्याची अट घालून राज्य सरकारने स्वतःच्याच महत्वाकांक्षी योजनेचे पंख छाटले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिवाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आलेल्या आणि त्यानंतर मंञीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या या योजनेचा सरकारी आदेश आज जारी करण्यात आला. २ लाखापेक्षा अधिक कर्ज असणार्या या योजनेनुसार कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, माञ यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेनुसार शेतकऱ्याच्या डोक्यावर कितीही ही कर्ज असले तरी दीड लाखापेक्षा अधिक असणारे सर्व कर्ज फोडल्यानंतर राज्य सरकार त्याच्या कर्जाच्या खात्यावर उर्वरीत दीड लाख रुपये जमा करत असे. शेतकर्‍याकडे वरचे भरण्यासाठी पैसे नसल्यानेच या योजनेला मर्यादा असल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत होते. आता माञ २ लाखापेक्षा अधिक कर्ज असणार्यांना या योजनेचा कुठल्याच पध्दतीने लाभ दिला जाणार नाही.

CAA : हाजी नसते, तर मी वाचलो नसतो; जमावाच्या तावडीत सापडलेल्या पोलिसाचा अनुभव

यामध्ये राज्य सरकारने कर्जमाफीचे निकष तपशीलवार जाहीर केले आहेत.

  • योजनेनुसार शेतकरी हा वैयक्तिक निकष मानला जाईल.
  • त्याची सर्व कर्जखाती मिळून दोन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आहे.
  • सरकारी नोकरदारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
  • सरकारी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • सरकारच्या विविध उपक्रम, एसटी महामंडळातील २५ हजार कमी मासिक उत्पन्न धारकांनाही हा लाभ घेता येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government has a debt waiver of two lakhs also imposed restrictions on farmers