यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना २०१४ मध्ये अनेक वचने दिली होती. गेल्या १२ वर्षांत एकही वचन पूर्ण झालेले नाही. उलट केंद्र सरकार शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतीसाठी निर्णय घेत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी केला.