- अविनाश साबापुरे
यवतमाळ - गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष, नगरसेवकांविना प्रशासकाच्या भरवशावर कारभार चाललाय. त्यातच आता राज्यातील 35 टक्के (242) मुख्याधिकार्यांची पदेही रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पदाधिकारीही नाही अन् प्रशासनाच्या खुर्च्याही रिकाम्या आहेत.